मुंबई, 9 एप्रिल : ठाण्यातील एका तरुणाने मारहाणीचा गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या चर्चेत आहेत. 'जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिल्याने त्यांच्या कार्यकर्ते आणि पोलिसांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून मला मला मारहाण केली,' असा आरोप संबंधित तरुणाने केला.
तरुणाने थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणानेही वेग पकडला. भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करा, अशी मागणी केली. तसंच भाजपच्या इतर नेत्यांनीही आव्हाडांवर जोरदार टीका केली. या सर्व टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं दु:ख जाहीरपणे मांडलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं असून त्यांना सोशल मीडियावर देण्यात येत असलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तसंच आपल्या भावनाही मांडल्या आहेत. 'हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली...कुणी केली... हत्या करण्याचे ठरले...कोण होते त्यात...असो...आईचे आशीर्वाद...पोलीस कारवाई करतील यावर,' असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours