मुंबई, 24 एप्रिल : महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आता कोरोना आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनंतर जवानांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत ड्युटीवर तैनात असलेल्या SRPF च्या जवानांना कोरोनाची लागण झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी हे जवान मुंबईहून पुण्यातील CRPF हेडक्वॉटरमध्ये हे जवान आले होते. या तीन जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता उर्वरित 96 जवानांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्या सर्व जवानांच्या चाचण्या घेण्यात येणार असून त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
गुजरातमधील बडोदा इथे सैन्याच्या तीन कर्मचार्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिघांनी त्याच दिवशी एटीएममधून पैसे काढले होते. या ATMमधून कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तीन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना आता क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours