बारामती: कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून बारामती पॅटर्नची कडक अंमलबजावणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय समितीच्या पथकाने शहरातील कॉन्टोलमेंट एरियामध्ये जाऊन, बारामती पॅटर्न कशा पद्धतीने राबवला जात आहे. नागरीकांना घरी बसून लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक वस्तू ,स्वयंसेवकांच्या माध्यमातून कशा पुरविल्या जातात. याचा आढावा त्यांनी घेतला. शेतकऱ्यांसाठी, परप्रांतीयांसाठी, महिलांसाठी आरोग्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत. याचीही माहिती या पथकाने घेतली.

विशेष करून पोलिस विभागाने कोरोना वॉरीयर्स, कोरोना सोल्जर आणि कोरोना फायटर असे तीन विभाग करून 44 झोनल ऑफिसर, 44 नगरसेवक, 44 पोलिस कर्मचारी प्रत्येक वार्डातील स्वयंसेवक यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे कोण, कुठली जबाबदारी पार पाडत आहे. हे ओळखपत्रवरून स्पष्ट होत होते. त्यामुळे बारामती पॅटर्न दिलासादायक आसल्याचे मत व्यक्त करून केंद्रीय समितीने या उपक्रमाचे कौतुक केलं आहे.

बारामतीत आतापर्यंत कोरोनाचे सात पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर एका वृद्धाचा यात मृत्यू झाला आहे. तर एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

बारामती शहरात केंद्रीय पथकातील डॉ.अरविंद अलोणी व डॉ. पी.के.सेन यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी शहरातील, स्टेशन रोड, महावीर पथ, कसबा, समर्थ नगर, सिल्‍व्‍हर ज्‍युबिली रूग्णालयाची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्‍यात येत असलेल्या आरोग्यविषयक सेवा सुविधांची माहिती दिली. शहरात ज्या भागात कोरोनोचे रूग्ण आढळले या भागाचा देखील त्यांनी परिपूर्ण आढावा घेतला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours