ठाणे: ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 195 करोना बाधित रुग्ण आढळलेत. एकाच दिवसात ठाण्यात एवढ्या मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर ठाणे जिल्हयात आज 2 जणांचा करोना मुखे मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा हा रेड झोन मध्ये असून देखील आता आणखी काळजी ठाणे जिल्हा वासियांनी घेणे गरजेचे आहे असं सांगितलं जात आहे. ठाणे जिल्ह्यात आता करोना बाधितांची संख्या 1 हजार 206 इतकी झाली आहे. तर ठाणे जिल्हयात आत्तापर्यंत करोनामुळे 31 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

यामुळे ठाणे जिल्हयात 150 पेक्षा जास्त करोना बाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. त्यात आता वाढ होण्याची शक्यता आहे. तर आनंदाची बाब म्हणजे सतत गजबलेले आणि दाटीवाटीचे शहर उल्हासनगर मध्ये आजही नवीन करोना बाधित रुग्ण आढळला नाही.

ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त 372 करोना बाधित ठाणे महानगर पालिका हद्दीत आढळलेत तर 69 जणांनी करोनावर मात केली असून 15 जणांचा करोना मुळे  मृत्यू झाला आहे.

ठाणे मनपा पाठोपाठ नवी मुंबई मनपा हद्दीत 289 करोना बाधित आढळलेत तर 56 जणांनी करोनावर मात केली असून 5 जणांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे.

केडीएमसी मनपा हद्दीत 181 करोना बाधित आढळलेत तर 54 जणांनी करोनावर मात केली असून 3 जणांचा करोनामुळे  मृत्यू झाला आहे.

मिरा भाईंदर मनपा हद्दीत १६५ करोना बाधित आढळलेत तर ४५जणांनी करोनावर मात केली असून ३ जणांचा करोना मुळे  मृत्यू झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours