मुंबई, 31 मे : महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा बसला आहे. सर्वसामान्यासह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. आता आणखी एका काँग्रेस नेते आणि माजी मंत्र्याला कोरोनाची लागण झाली होती. पण 20 दिवस संघर्ष करून त्यांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. चेंबूर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. चेंबूर परिसरातील गरजू लोकांसाठी काँग्रेसचे नेते मदतीसाठी धावून आले होते. परिसरातील सर्व लोकांसाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मदतकार्य सुरू केले होते. परंतु, मदकार्य करत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली. त्यानंतर त्यांना शहरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली 20 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
या काळात एकापाठोपाठ त्यांच्या 3 कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे चिंता वाढली होती. त्यानंतर त्यांची चौथी चाचणी घेण्यात आली असता ती निगेटिव्ह आढळून आली. चौथी चाचणी निगेटिव्ह आढळून येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कोरोनातून मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून निवासस्थानी पोहोचताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता.
Post A Comment:
0 comments so far,add yours