मुंबई: मुंबईत कोरोना व्हायरसचा कहर वाढत आहे. त्यातच आता मुंबईत आणखी एक धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतपीक उद्ध्वस्त करणाऱ्या कीटकांचा झुंड (टोळधाड) मुंबईत आल्याची माहिती स्तंभलेखक शोभा डे यांनी केली आहे. ट्विट करुन त्यांनी याची माहिती दिली आहे. मुंबईत टोळधाड आल्याचा दावा शोभा डे यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. मुंबईत टोळधाड आल्याची माहिती अद्याप कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून किंवा शास्त्रज्ञांनी दिली नाही.  पण सोशल मीडियावर मात्र मुंबईत टोळधाड आल्याच्या अफवेला चांगला पेव फुटला आहे.

शोभा डे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, टोळधाड हे मुंबईत आले आहे. मुंबईत तुमचं स्वागत आहे. राजकीय कीटकांशी तुम्ही सोबत करू शकता. गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअपवर याबाबतची माहिती फिरत आहे.

याशिवाय ट्विटर वापरकक्ते नीतू चंद्रा श्रीवास्तव यांनी टोळधाळीच्या झुंडीचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ही व्हिडीओ कुलाबामधील असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी विभागाने दिलेल्या माहितीनुसार टोळधाडींवर नियंत्रण आणण्यासाठीचे काम सुरू झाले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि गुजरात या राज्यांतील काही भागांमध्ये टोळधाडीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours