पुणे, 29 मे : जुन्नर इथल्या विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यावर जुन्नर पोलिसात मारहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी अक्षय बोऱ्हाडे या युवकाला बंगल्यावर बोलावून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक इथे अनधिकृतपणे मनोरुग्णांची संस्था चालवत असलेल्या अक्षय मोहन बोऱ्हाडे या तरुणाने केला आहे. त्यासंबंधी त्याने एक फेसबूक लाईव्हसुद्धा केलं होतं. पण एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये सत्यशील शेरकर यांनी मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे.
याबाबत अक्षय बोऱ्हाडे याने सोशल मीडियावर फेसबूक लाईव्हवर यासंबंधी आरोप केला होता. आपण समाजासाठी काम करत असताना पैशासाठी काही लोकांनी मला मारहाण केल्याचं अक्षयने फेसबूक लाईव्हमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा अक्षय बोऱ्हाडेनं जुन्नर पोलिसात तक्रार दाखल केली. यानुसार जुन्नर पोलिसांनी शेरकर यांच्यावर भा.द.वि.क 323/324/504/506 व आर्म अॅक्ट 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षापासून मी आणि माझे कुटुंब एकत्र येत निराधार आणि मनोरुग्ण लोकांची सेवा करत आहोत. पण माझं चांगलं काम गावातील काही लोकांना सहन झालं नाही. त्यामुळे सत्यशील शेरकर यांनी मला बंगल्यावर बोलावून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांची सर्व लोकं नुसती बघत बसली. कोणीही मदतीसाठी आलं नाही. मला फोट्या बांबूने पायावर आणि पाठणीवर मारल्याचं अक्षयने सांगितलं.
शेरकर यांनी फेटाळले आरोप
शेरकर म्हणाले की, परिसरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात अक्षयने बाहेरून एका मनोरुग्णाला आणलं. ही माहिती मला गावकऱ्यांनी दिली. या संस्थेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. म्हणून ग्रामस्थांनी त्याला बोलावलं. तर ग्रामस्थांच्या प्रश्नाला अरेरावीची उत्तर देत अक्षय तिथून गेला आणि त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ बनवल्याचं शेरकर म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours