पुणे, 29 मे : पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव व चाकण औद्योगिक वसाहतीत आता कोरोचा शिरकाव झाला असून रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कामगाराचा कोरोनाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका मोठ्या कंपनीत हा कामगार पुण्याच्या हडपसर भागातून कामासाठी येत होता. परंतु या कामगारांचा अचानक मृत्यू झाला.

मृत्यूनंतर या कामगाराची कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. या धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या कामगाला कोरोनाची लागन झाल्याचं स्पष्ट झालं असून कोरोनाने या कामगाराचा मृत्यू झाल्यानं रांजणगाव औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर 50 कामगारांना आता क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी इथे एका प्रसिद्ध आणि बड्या कंपनीतील कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे. या कामगारावरती पिंपरी चिंचवडमधील एका रूग्नालयात उपचार सुरू आहेत. हा कामगार पिंपरी चिंचवड परिसरातील काळेवाडी इथून चाकण औद्योगिक वसाहतीत कामाला येत होता. त्यामुळे या कामगाराच्या संपर्कातील कामगारांनाही प्रशासनानं आता क्वॉरंटाईन केलं आहे.

दरम्यान, पुण्यात गुरुवारी रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ झाली. दिवसभरात 318 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 205 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर 10 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. 150 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5851 वर गेली आहे. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2294 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 293 वर गेला आहे. आतापर्यंतच एकूण 3264 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 1315 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. त्यामुळे कोरोनाची वाढ रोखायची कशी असा प्रश्न सरकारला पडला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours