माझ्या गावकरी बंधु-भगीनींनो व बाहेर जिल्ह्यातुन स्वगावी येणार्यांनो. आपल्या गावातील सरपंच,पोलीस पाटील,आरोग्य सेवक, तलाठी,ग्रामसेवक, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी एखादा कटु निर्णय घेतला तरी तो निर्णय गावच्या हितासाठी आहे. तुमच्या गावाच्या सोनेरी भविष्यासाठी आहे. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची व गावाची काळजी म्हणून व अनेकांच्या हितापोटी निर्णय घ्यावा लागतोय, समाजहित आणि सामाजिक कर्तव्य म्हणून असा निर्णय घ्यावा लागतोय. गावाची आणि आपल्याच भावंडांची, भाऊ - बंदकीची व गावाची काळजी म्हणून हा निर्णय घ्यावा लागतोय. ज्या गावच्या मातीत आपण एकत्रित खेळलो, बागडलो, लहानाचे मोठे झालो,त्यांचे मन दुखवण्याचा कोणाचाही हेतू नाही आणि कदापी असणार नाही.   तुम्हाला कांहीही होवु नये. यासाठी जड अंतकरणाने, काळजावर दगड ठेवून हे कर्तव्य पार पाडावं लागतय.
👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦
         बांधवांनो, जरी तुम्हाला या अशा कठीण काळात होम क्वारंटाईन केलं किंवा शाळेत ठेवलं म्हणुन  राग मानुन घेवु नका, अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. मला आशा आहे की मानव वंशाच्या मुळावर उठलेल्या या कोरोनारुपी संकटाला आपण सर्वजण मिळून या जगाच्या पाठीवरुन कायमस्वरुपी हद्दपार करु....
☠️☠️☠️☠️☠️☠️
      बांधवांनो, तलाठी,सरपंच,ग्रामसेवक पोलीस  पाटील  वाईट नसतो ! वाईट आहे तो, परदेशातून आलेला कोरोना... जो माणुसकीची सत्वपरिक्षा घेतोय. जो नात्यांची, मित्रांची, आई - वडिल, बहीण - भावंडं, आणि ग्रामस्थ, शासन - प्रशासन - जनता या सर्वांची अग्निपरीक्षा घेतोय...
          परंतू लक्षात ठेव कोरोना... आम्ही तुला पुरुन उरणार...! आणि शेवटी माणुस, माणुसकी आणि मानवतावादाचाच विजय होणार हे निश्चित....
   ... मनावर दगड ठेवा-गांव प्रशासनास सहकार्य करा..

🌹🌹 गावप्रशासनास सहकार्य करा - कोरोणाला दुर सारा🌹 🌹 
  आपला शुभचिंतक
    उत्तम भागडकर सरपंच गुंजेपार /किन्ही
💐💐🤝🤝💐💐
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours