मुंबई, 25 मे: राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक एक्स्पेसवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. रेल्वेमंत्र्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यांसाठी125 ट्रेन देण्यास तयार आहोत. मात्र, राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी तात्काळ रेल्वेला पाठवण्याचं आवाहन केलं होतं. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत 3 ट्वीट केले. रात्री 12 वाजता पुन्हा ट्वीट केलं. 'रात्रीचे 12 वाजले आहेत आणि 5 तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून 125 ट्रेन्स आणि प्रवाशांची यादी आली नाही. मी रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रतिक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा असे, आदेश दिले आहेत, असं पियूष गोयल यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. श्रमिक रेल्वे सोडण्यासंदर्भातचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळ घेतला त्यामुळे नियोजित केलेल्या 65 रेल्वे रद्द कराव्या लागल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. महाराष्ट्र सरकारची तयारी नसल्यामुळे मे महिन्यातच नियोजित केलेल्या 65 रेल्वे रद्द कराव्या लागल्याची माहिती मध्य रेल्वेने पत्रक प्रसिद्ध करत दिली आहे. नाशिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये श्रमिक रेल्वे सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मागणी केली नसल्याचं दिसून आल्याचं निरीक्षणही मध्य रेल्वेकडून या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours