मुंबई, 02 मे : कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या मुंबईवर आता चक्रीवादळाचं नवं संकट आलं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. यावेळी वारे ताशी सुमारे 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. बीएमसी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील राज्य सरकारी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी केली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र मंगळवारी सकाळपर्यंत तीव्र डिप्रेशनमध्ये बदलेल. यामुळे मुंबईत मंगळवारी रात्री ते बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळाचं गांभीर्य लक्षात घेता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी हवामान खात्याने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला होता, परंतु सोमवारी तो बदलून रेड करण्यात आला आहे.
पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळापासून बचाव करण्यासाठी राज्य सरकारनं पालिकेला अनेक सूचना दिल्या आहेत. ज्या रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. तिथे लाईट जाता कामा नये याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी. खुल्या मैदानात बांधलेल्या कोव्हिड केंद्रांची परिस्थिती पाहूनच तिथे रुग्णांना दाखल केलं जावं. तिथे दाखल असलेल्या रूग्णांना गरज भासल्यास इतरत्र हलवण्याची तयारी ठेवली पाहिजे. जिथे सखल भागात पाणी भरण्याची शक्यता आहे तिथे क्विक रिस्पॉन्स टीमला आवश्यक असल्यास अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तयार ठेवावं, असा सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत एनडीआरएफची (NDRF )3 पथक तैनात
मुंबईला निसर्ग चक्रीवादळापासून वाचवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला (एनडीआरएफ) ची तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. 6 टीम राज्याच्या इतर भागात पाठवण्यात आले आहेत. या टीम किनारपट्टी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईशिवाय पालघर इथे दोन आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आलं आहे.
ही पथकं महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. बीएमसी अधिकारी म्हणाले की, मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार राहण्यास सांगितलं आहे. बचावकर्ते समुद्र किना-यावर तैनात असतील.
अतिवृष्टीची भीती
सोमवारी मुंबईत हलका पाऊस झाला. 'स्कायमेट' या खासगी हवामान खात्याचे प्रमुख महेश पलावत म्हणाले की, "वादळ अद्याप तयार झालेलं नाही आणि अरबी समुद्राच्या मुंबई किनाऱ्यापासून सुमारे 600 किमी अंतरावर आहे." हे तीव्र नैराश्य भयानक वादळाचे रूप धारण करू शकते आणि नंतर उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून वेगाने पुढे जाईल. या काळात मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड इथे 100 ते 200 मिलीमीटर पाऊस पडेल. वादळाचा सर्वाधिक परिणाम पालघरमध्ये दिसून येतो. 4 जूनच्या सकाळपर्यंत, त्याचा परिणाम सौम्य होईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours