पुणे, 15 जून : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही हेक्टरी नाही तर प्रतिफळ झाड मिळावी, कारण हे कोकणातील फळबागांचं नुकसान पुढच्या पाच ते पंधरावर्षांसाठीचं असणार हे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजपतर्फे आज कोकणातील आंजर्ले गावासाठी पत्रे, कौलं आणि धान्याची मदत पाठवण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.
'कोकणातील चक्रीवादळ नुकसानाबाबत आम्ही केंद्रीय कृषिमंत्र्यांशी बोललो असून राज्याने केंद्राकडूनही मदत मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहे, कारण राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे, असंही ते म्हणाले.
तसंच, 'सरकार कोरोनाच्या बाबतीत गोंधळलेलं आहे, मुळात हे सरकारचं लेचंपेचं हे, कोणी निर्णय करायचे कसे निर्णय करायचे ? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळेच प्रशासकीय पातळीवर गोंधळ दिसत आहेस अशी टीकाही पाटील यांनी केली.
शरद पवार या सरकारला मार्गदर्शन करतात असं दिसत नाही, कारण त्यांचा कामाचा स्पीड भयंकर आहे, कदाचित मुलं-मुलं करत आहेत तर करू द्या अशी त्यांची भूमिका असावी तसंच मुख्यमंत्री हे तास दोन तासांचा कोकण करून येतात, याउलट पवार हे दोन दिवस कोकणात मुक्काम करतात. पवार या वयात दौऱ्यावर जात असतील तर मग राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार हे मंत्री कोकणात का जात नाहीत? असा टोला चंद्रकांत पाटलांनी आघाडी सरकारला लगावला. विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी पवारांवर टीका केली होती.
तसंच 'मुख्य सचिव अजोय मेहता यांना पुन्हा मुदतवाढ मिळूच शकत नाही, कारण त्यांना यापूर्वीच कोरोना महामारीमुळे मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे मुख्य सचिवांच्या मुदत वाढीवरून आघाडीत का भांडणं सुरू आहेत हेच कळत नाही.' असंही पाटील म्हणाले.
पुण्यात प्रायव्हेट हॉस्पिटलंची बीलं कोरोना पेशंट्ना भरायला सांगणं चुकीचं आहे. पालिकेनं सीएसआर फंडाद्वारे पैसा उभा करावा, केंद्र सरकार थेट पालिकेला आर्थिक मदत करू शकत नाही, त्यासाठी व्हाया राज्यच यावं लागेल. केंद्राकडून पुणे मनपाला कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप होत आहे, त्यावर पाटलांनी उत्तर दिले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours