पुणे, 15 जून : पुणे शहर आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परंतु, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरात 15 जूनपासून पुन्हा कडक लॉकडाउन लागू होणार अशी चर्चा रंगली होती. पण पुण्यात प्रतिबंधित क्षेत्र पुण्यात प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कन्टेन्मेंट झोन्सची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यानुसार निर्बंध आणखी शिथील होण्याची शक्यता आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात सर्व प्रकारच्या व्यापाराची दुकानं उघडायची का नाही याचा निर्णय प्रतिबंधित क्षेत्र पुनर्रचना झाल्यावर ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुढच्या 1ते 2 दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुण्यात कुठे निर्बंध उठणार आणि कुठे आणखी लॉकडाऊन वाढण्याचा हे ठरवलं जाईल.
दरम्यान, शहरात येत्या सोमवारपासून पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा आमचा कोणताही निर्णय झाला नाही, असं महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउनच्या काळात ज्या भागात जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तो परिसर कन्टेन्मेंट झोन करण्यात आला होता. आता पुण्यात जो भाग आधी ग्रीन झोनमध्ये होता तिथेही रुग्ण आढळून आले आहे.
ज्या ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येईल, त्या भागाची परिस्थिती लक्षात घेऊन कन्टेन्मेंट आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून नव्याने त्या परिसराची रचना करण्यात येईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली. या बाबतचा आदेश हा सोमवारी दिनांक 15 जून रोजी काढण्यात येणार आहे, असंही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours