यवतमाळ : जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता लवकरच कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना देऊन उपचार केले जाणार आहेत. यासंदर्भात विषयावर वैद्यकीय महाविद्यालयासोबत इथिकल कमिटीची मिटिंग झाली असून याच्या परवानगीसाठी पत्र आयसीएमआर दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर आणि प्रधान सचिव यांच्या परवानगीनंतर ही प्लाझ्मा थेरपी प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचं यवतमाळ जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी
सांगितले आहे. त्यासाठी 50 ते 60 लाख रुपये लागतील ते जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून करणार आहोत असेही जिल्हाधिकारी सिंग यांनी सांगितले.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना देण्यात येईल. म्हणजेच, जी व्यक्ती पूर्णपणे कोरोनातून बरी होणार आहे. त्या व्यक्तीचा प्लाझ्मा नवीन रुग्णाला देण्यात येणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला कुठल्याही दुसरा आजार नाही, हे सुद्धा तपासले जाणार असल्याचं वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता राजेश सिंग यांनी सांगितले आहे .
Post A Comment:
0 comments so far,add yours