पवनीत 25 कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश💐

प्रतिनिधी/भांडरा: शिवसेनेत दगाबाज लोकांना वाव नाही,आम्ही सदैव प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहातो असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. 1 ऑक्टोबर ला पवनी येथील लक्ष्मी  रमा सभागृहात पवनी तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. नवनियुक्त जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाजप व अन्य पक्षातील 25 कार्यकर्त्यांनी आमदार नरेंद्र भोंडे कर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेशघेतला. 

मतदार संघातील कधी नव्हे ती होत  असलेली विकासकामे व कार्यकर्त्यांना  विविध शासकीय योजनांचा मिळत असेलला लाभ यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे.या ना त्या कारणाने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,मात्र मी अश्या ब्ल्ययाकमेलर्सच्या आरोपांना भीक घालत नाही,असा सज्जड दम देत मला सर्व सामान्य गोरगरीब जनतेची चिंता आहे ,त्यांचा भल्यासाठी मी बांधील असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. जिल्हा प्रमुख अनिल गायधने, पवनी तालुका प्रमुख विजय काटेखये,युवासेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, जिल्हा समनवयक किशोर चौधरी, तुमसर तालुका प्रमुख नरेश उचिबगले,जेष्ठ कार्यकर्ते आशीष माटे, विधानसभा प्रमुख बाळू फुलबांधे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख जितेश  ईखार,पवनी शहर प्रमुख नरेश बावनकर, गणेश मुंडले,प्रशांत भूते, राजू ब्राह्मकर, मुन्ना तिघरे,श्रीकांत मेश्राम, संजय वलके,नामदेव सुरकर,महिला आघाडीच्या रुपळता वंजारी,भाग्यश्री गभने, नंदा देशमुख आदी मंचावर उपस्थित होते. किशोर वैद्य, जगदीश वैद्य,प्रशांत लांजेवार, सुनील लेंडे, अरुण बावनकर, धनपाल गभने, निवृत्ती पडोळे,हेमंत वैद्य शैलेश मरघडे, समीर कुरझेकर, ऋषी सुपारे, कामेश बावनकर,प्रांजल आकरे,त्र्यम्बक गिर्हेपुंजे, मेघश्याम गिर्हेपुंजे, वसंता काटे खये,केवळरामम उईके,भाऊदास खोब्रागडे, नारायण वाढइ,सविता भांडारकर, योगिता माकडे, बालिताई देशमुख,जयश्री बंजारी,रामेसवर जीभकाटे

आदिंनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन अनिल धकाते यांनी केले,बाळू फुलबांधे यांनी आभार मानले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours