विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

 भंडारा, दि. ३ ऑटोबर:- येथील जे. एम. पटेल महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यवस्थापन शास्त्र व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ' नई तालीम विषयी महात्मा गांधीजींचे विचार' या विषयावर आभासी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षात महात्मा गांधी यांची जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या हिंसक घडामोडी, अशांतता, असुरक्षितता व भितीदायक वातावरण बदलण्यासाठी महात्मा गांधीजी यांची सत्य, अहिंसा व सत्याग्रह ही मूल्ये जागतिक पातळीवर स्वीकारण्याची गरज आहे असे विचार मांडले.

 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सेवाग्राम येथील नई तालीमचे समन्वयक   डॉ. प्रभाकर पुसदकर यांनी महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्याची माहिती देताना समताधारित, न्यायपूर्ण, शाश्वत व अहिंसात्मक समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षण पद्धतीत बदल करणे अपरिहार्य आहे. गांधीजींची नई तालीम संकल्पना ही शिक्षण हे कृतीयुक्त, कौशल्य आधारित, उद्योग पूरक आणि सर्वांगीण विकास करणारी आहे. या शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे डॉ. पुसदकर यांनी नमुद केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक प्रा. भोजराज श्रीरामे व डॉ. उज्वला वंजारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रदीप मेश्राम यांनी मानले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता डॉ. कार्तिक पनीकर, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, डॉ. प्रशांत माणुसमारे, विभाग प्रमुख, व्यवस्थापन शास्त्र व संशोधन विभाग, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. वीणा महाजन महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours