विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा, दि. २२ नोव्हेंबर :- भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पिकाची कापणी मोठ्या प्रमाणात केली व काही सुरू आहे , सध्या  निसर्गाच्या असमतोल वातावरणामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्यात शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर कधी निसर्ग कोपतो त्यात कधी ओला व सुका दुष्काळाचा सामना करावा लागतो. आयुष्याभर शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत राहतो. सावकाराचे कर्ज, बँका मधुन कर्ज , तर कधी उसनवार पैसे घेणे या सर्व प्रक्रियेतून शेतकरी रोजच जातो आहे. मुला-बाळांचे शिक्षण , याकडे लक्ष देत शेतकरी यांचे जीवन मान आहे. ऋतुच काही समजेना, कधी पण बरसतो, शेतऱ्यांच्या भावना समजून घेन महत्वाचे आहे. 

  केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आताच तीन कायदे मागे घेतले, शेतकऱ्यांना दिलासा दिला.

  मतभेद विसरून जिल्ह्यात झालेल्या शेतातील भातपिकांचे, बागायती शेतीचे संबधीत तलाठी व कृषी अधिकारी, कृषी सेवक यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर जिल्हा प्रशासन व शासनाने करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव उमेश मोहतुरे यांनी केली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours