उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कारा'चे कोमल परतेकी व श्रुती गाडेगोने यांना प्रदान

विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा,दिनांक २८ जानेवारी:- लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब  तर्फे दरवर्षीप्रमाणे मागील १७ वर्षांपासून निसर्गातील अनेक वन्यजीव, पक्षी, साप यांना जीवदान देणे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमात योगदान देणे याकरिता निसर्गमित्र -पक्षी, तसेच सर्पमित्रांचा सत्कार प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच स्मृतिचिन्ह देऊन करण्यात येतो तसेच त्यांना अधिकाधिक निसर्गसेवेसाठी प्रोत्साहित करण्यात येते. यावर्षी सुध्दा हा कार्यक्रम ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यालयात लागोपाठ १७ व्या वर्षी आयोजित करण्यात आला.

    यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक डॉ मनोज आगलावे, अशोका बिल्डकॉनचे सहाय्यक अभियंता नितेश नगरकर, ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर हे प्रमुख अतिथी तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी दिलीप भैसारे  हे होते. कार्यक्रमाला नेफडो जिल्हा शाखा भंडारा तसेच अ.भा. अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा यांचेसुद्धा सहकार्य लाभले.

 सर्वप्रथम वृक्षपूजन तसेच वृक्षभेट देऊन पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविक ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी केले तर कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य यांनी सांगितले. यानंतर प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांनी ग्रीनफ्रेंड्स दरवर्षी निसर्गकार्यात झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून प्रोत्साहन देतो त्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर कालेजवार, ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी दिलीप भैसारे यांनी ग्रीनफ्रेंड्सला मागील ५ वर्षापासून देत असलेल्या अमूल्य अशा सहकार्याबद्दल डॉ. मनोज आगलावे, सहाय्यक अभियंता नितेश नगरकर यांचा ग्रीनफ्रेंड्सच्या लाखनी बसस्थानकावरील 'नेचर पार्क' उभारणीसाठी मागील ५ वर्षापासून केलेल्या सहकार्याबद्दल सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रीनफ्रेंड्स तर्फे 'उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कार'  कोमल परतेकी व श्रुती गाडेगोने यांनी मागील ४ वर्षांपासून केलेल्या विविध पक्षीमोहिमा व पर्यावरण जागृती उपक्रम, इ -बर्ड पक्षीनोंदी मध्ये सहभाग व फुलपाखराच्या विविध प्रजातीच्या ७० पेक्षा जास्त नोंदीबद्दल देण्यात आला. यामध्ये पुरस्कार प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, पक्षीपुस्तक ३,५०० रु रोख रक्कम प्रमुख अतिथी तसेच ग्रीनफ्रेंड्सच्या प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते कोमल व श्रुतीला प्रदान करण्यात आला. कोमलच्या वतीने तिचे वडील घनश्याम परतेकी तर श्रुतीने स्वतः पुरस्कार स्वीकारून मनोगत व्यक्त केले. यानंतर मागील १७ वर्षापासून अविरतपणे कार्यरत राहून शेकडोंच्या संख्येने जखमी वन्यप्राणी, जखमी पक्षी यांना जीवदान तसेच नागरिकांच्या घरून हजारोंच्या संख्येने विषारी बिनविषारी सापांची सुटका करून जीवदान देणारे साकोलीचे निसर्गमित्र युवराज बोबडे, सुरेंद्र राऊत, गोविंद धुर्वे, लाखनीचे निसर्गमित्र पंकज भिवगडे, विवेक बावनकुळे, मयुर गायधने, दर्वेश दिघोरे, मनीष बावनकुळे, धनंजय कापगते,सलाम बेग, नितीन निर्वाण, रुपेश निर्वाण, आरिफ बेग, आकाश सोनटक्के यांना ग्रीनफ्रेंड्सतर्फे निसर्गमित्र-सर्पमित्र पुरस्कार, प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह प्रमुख अतिथीच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.जे.एम.सी फ्लायओव्हर कन्स्ट्रक्शन कंपनीचे उपमुख्य अभियंता अजय प्रताप सिंग यांनी मागील दीड वर्षात ग्रीनफ्रेंड्सच्या बसस्थानकावर  'नेचर पार्क' उभारणीकरिता जे.एम.सी.च्या वतीने केलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल सत्कार तसेच मदुराई तामिळनाडू येथे स्थानांतरण झाल्यामुळे  निरोपप्रसंगी शाल,श्रीफळ व वृक्षभेट देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून ग्रीनफ्रेंड्स बद्दल कृतज्ञता,सहहृदयता व्यक्त केली. यानंतर मागील १७ वर्षाप्रमाणे यावर्षी कोरोनाकाळात सुद्धा घेण्यात आलेल्या २० पेक्षा जास्त स्पर्धा व उपक्रम यामध्ये विशेषकरून पर्यावरण स्नेही दीपावली निमित्ताने घेण्यात आलेल्या फटाकामुक्त दिवाळीबद्दल पर्यावरण संदेश रांगोळी स्पर्धा व शिववैभव किल्ला स्पर्धा या खुल्या स्पर्धेचे बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह वितरण त्याचसोबत यावर्षीसुद्धा कोरोनाकाळात वर्षभर कार्यक्रम मागील १७ वर्षाप्रमाणे राबविण्यात येऊन  घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा- उपक्रम जसे वन्यजीवसप्ताह निमित्ताने टायगर फेस पेंटिंग, टायगर मास्क मेकिंग, रक्षाबंधन निमित्ताने वृक्षवाढदिवस कार्यक्रम, पर्यावरणस्नेही राखी बनवा स्पर्धा, गणपती मूर्ती बनवा स्पर्धा,निर्माल्य गोळा करणे स्पर्धा, गणेश विसर्जन कुंड, फटाक्याचा वापर न करता व केरकचरासफाई मोहीम राबवून तयार करण्यात आलेली पर्यावरण संदेश रावण प्रतिकृती व विजयादशमी कार्यक्रम, मकरसंक्रांती निमित्ताने पर्यावरण संदेश पतंग बनवा स्पर्धा आणी वृक्षरोपे वाण वाटप कार्यक्रम, होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने ग्रामसफाई करून केरकचरा होळी कार्यक्रम, नैसर्गिक रंग बनवा स्पर्धा, राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्ताने -खगोल प्रश्नमंजुषा स्पर्धा, जागतिक वन व चिमणी दिन निमित्ताने घरटी बनवा स्पर्धा, जागतिक गिधाड दिन निमित्ताने आयोजित गिधाड चित्रकला स्पर्धा, जागतिक जल दिन निमित्ताने घेण्यात आलेली पक्षी पाणपोई बनवा स्पर्धा, वसुंधरा दिना निमित्ताने घेण्यात आलेल्या पृथ्वी संदेश चित्रकला स्पर्धा , सारस तसेच सुगरण पक्षी गणना, लाखनी व साकोली परिसरातील मागील २० वर्षांपासून सातत्याने घेण्यात येणारी स्थानिक पावसाळी, हिवाळी व उन्हाळी पक्षीगणना तसेच दरवर्षी घेण्यात येणारी २५ ते ३० तलावावरील स्थलांतरित पक्षीगणना तसेच फुलपाखरू निरीक्षण व गणना त्याचबरोबर रात्रीचे आकाशदर्शन, ग्रह तारे, नक्षत्रदर्शन तसेच विविध वैशिष्ट्य पूर्ण प्रासंगिक चांद्रदर्शन वैशिष्ट्य पूर्ण प्रासंगिक ग्रहदर्शन, सूर्यदर्शन, उल्कापात वर्षाव मोहिमा, अनेक ठिकाणी घेण्यात आलेले निसर्ग जनजागृती कार्यक्रम, लाखनी बसस्थानक 'नेचरपार्क' उभारणी कार्यातील स्वयंसेवक, विविध ठिकाणी निसर्ग भ्रमंती इत्यादी सर्व उपक्रमातील स्पर्धा विजेत्यांना व उपक्रमात प्रत्यक्ष सहभागीना बक्षिसे आणि प्रमाणपत्र प्रमुख अतिथींच्या हस्ते ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देण्यात आले. याचवेळी ग्रीनफ्रेंड्सला दिलेल्या अमूल्य अशा सेवेबद्दल ज्येष्ठ नागरिक दिनकर कालेजवार व मंगल खांडेकर यांचा सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने बसस्थानक लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्सच्या 'नेचर पार्क' मध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

सत्कार सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगल खांडेकर व दिलीप भैसारे यांनी केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours