विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा, दिनांक २६ जानेवारी:- आदर्श बहुउद्देशिय मंडळ आंबेडकर वार्ड भंडारा द्वारा संचालित वैनगंगा उच्च प्राथ. शाळा वार्ड: भंडारा येथे भारतीय प्रजासत्ताकाचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ दिनांक २६ जानेवारी २०२२ ला ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

 ध्वजारोहणाच कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

     त्याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती प्रेमाताई वाडीभस्मे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक सचिव विलास केजरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव मनोज वाडीभस्मे, संस्था अध्यक्ष जागेश्वर साठवणे, वैनगंगा उच्च प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. रामटेके, खवास उपस्थित होते. 

   त्यावेळी सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत झाले. आणि प्रजासत्ताक दिन चिरायू हो, भारतीय संविधान अमर रहे, सविधान वाचवा- देश वाचवा, महात्मा गांधी की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

     कार्यक्रमाचे संचालन व्ही. डी. गौतम यांनी केले तर आभार एस. एम. अवचट यांनी मानले. 

        कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता

एम. डी. डोंगरवार, प्रमिला धाबेकर, सुषमा गोन्नाडे, वैशाली गोन्नाडे स.शि. एन. एस. शेंडे, जी. आर. जिभकाटे, संस्कृत केजरकर इत्यादींनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours