विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा,दिनांक २८ जानेवारी:- भंडारा तालुक्यातील माटोरा येथील युवा सरपंच किशोरजी निंबार्ते यांनी गावात इतिहास रचला आहे. दि. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ग्राम पंचायतचा संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या हस्ते २६ जानेवारीला ध्वजारोहण केले जाईल. असा संदेश गावकऱ्यांना दिला. त्या उपक्रमास प्रतिसाद देत तब्बल २१२ कुटुंबानी कर भरला. २१२ कुटुंब प्रमुखापैकी ईश्वर चिठ्ठीने विमल गोमा खराबे यांची निवड  करण्यात आली. त्यावेळी सरपंच किशोर निंबार्ते, उपसरपंच भूमिता कोडवते, ग्राम पंचायतचे सदस्यगण राजेंद्र उईके, मिलींद रामटेके, छाया निंबार्ते, लिनता सोनवाने, हेमंत सेलोकर, निकीता रेहपाडे, नवनिर्वाचित पं. स. सदस्या स्वातीताई मेश्राम, माजी पं.स. सदस्या नितूताई सेलोकर, माजी उपसरपंच मधुकर तितीरमारे, हितेश सेलोकर, ग्राम सचिव संजय निमजे, विविध कार्यालयांचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच प्रतिष्ठित नागरीकांच्या उपस्थितीत विमल गोमा खराबे यांच्या  हस्ते २६ जानेवारी २०२२ दिनी ग्राम पंचायत कार्यालय माटोरा येथील ध्वजारोहण करण्यात आले. सरपंचांनी , ग्रा.प. चे ध्वजारोहणाचा मान गावकऱ्यांना दिल्याबद्दल गावकऱ्यांतर्फे त्यांचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे संचलन पदवीधर शिक्षक चौधरी यांनी यांनी केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours