भंडारा शहरातील घटना

आरोपी ताब्यात

भंडारा : शहरातील हेडगेवार चौक परिसरातील स्व. अण्णाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे एका व्यक्तीने शिरून विद्यार्थी युवकावर गावठी बंदुकीतून गोळी झाडली त्यात जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाचनालयात उपस्थित अन्य विद्यार्थ्यांनी आरोपीला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले. सदर घटना आज ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. अतुल बाळकृष्ण वंजारी वय ३० वर्षे रा.गणेशपुर असे मृत युवकाचे नाव आहे. तर गंगाधर नारायण निखारे वय ४२ वर्षे रा.पद्मा वार्ड पवनी असे आरोपीचे नाव आहे.जुन्या प्रेमप्रकरणाच्या वादातुन हे हत्याकांड घडल्याचा प्रथमदर्शी दिसुन येत आहे.



 शहरातील डॉक्टर हेडगेवार चौक येथील स्वर्गीय अण्णाजी कुलकर्णी सेवासदन येथे विद्यार्थ्यांकरिता नि:शुल्क सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका चालविली जाते. नेहमीप्रमाणे आज दि.३ सप्टेंबर रोजी काही विद्यार्थी येथे अभ्यास करीत असताना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी गंगाधर नारायण निखारे याने वाचनालयात शिरकाव केला. यावेळी त्याने कुणाचा तरी शोध घेत अचानक त्याच्याकडील बंदूक काढून उपस्थित विद्यार्थ्यांना हात वर करण्यास सांगितले. व काही कळण्याच्या आतच त्याने मृतक अतुल वंजारी याच्यावर गोळी झाडली.त्यात अतुल हा गंभीर जखमी झाला. यावेळी इतर विद्यार्थ्यांनी धाव घेत आरोपीला मागेहून पकडून बंदूक दूर फेकली व पोलिसांना कळविले. सूचना मिळताच तातडीने भंडारा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी पथकासह घटनास्थळ गाठीत आरोपीला ताब्यात घेतले. तर जखमी अतुल वंजारी याला तातडीने उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील,स्थागुशाचे पोनि.जयवंत चव्हाण यांच्यासह दंगल नियंत्रक पथक व अतिरिक्त पोलीस कुमक आदि घटनास्थली दाखल झाले होते.



मृतक अतुल वंजारी व आरोपी गंगाधर निखारे यांच्यात दोन ते तीन वर्षापुर्वीचा प्रेमप्रकरणाचा जुना वाद असुन त्या प्रकरणी आरोपी व मृतक यांनी एकमेकांविरोधात तक्रार नोंदविली होती व त्या अनुषंगाने भंडारा पोलीसात गुन्हासुध्दा नोंदविण्यात आला होता.आणि त्याच जुन्या वादातुन आरापीने हे कृत्य केल्याचे निरीक्षन पोलीस विभागाने नोंदविले आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours