भंडारा - महाराश्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ऑटोरिक्षा चालकांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अ.भा. भ्रष्टाचार विरोधी सामाजि न्याय मंचाचे अध्यक्ष सुजर परदेशी होते. यावेळी बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, राजकुमार दहेकर, सुरज पाठदिवटे, लक्ष्मीकांत दांडेकर उपस्थित होते. यावेळी गांधी चौक भंडारा येथे सार्वजनिक वाचनालयासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. व सावित्रीबाई फुले यांच्या जिवनाबद्दल महिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित असलेले ऑटोरिक्शा चालक अरुण ठाकरे, युनिस खान व अनिल झाडे यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours