भंडारा, दि. 5 : आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या सर्वसामान्य गरजू रुग्णांना आरोग्याच्या गंभीर व निवडक आजारांसाठी अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 2018 पासून आरोग्य विमा योजना राबविली जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला रूपये 5 लाखाचा विमा सुरक्षा कवच पुरविला जातो. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक 3 जानेवारी  रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.



महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाखांदूर, मोहाडी व लाखनी येथील ग्रामीण रूग्णालयाला समाविष्ट करून घेण्यात यावे. समाविष्ट करण्याकरिता शासनाकडे मागणी करावी. सर्व प्रायव्हेंट हॉस्पिटलमध्ये या योजनेकरिता सुविधा दिल्या जात नाही त्यांची कारणे शोधून जास्तित जास्त लाभ देण्याकरिता प्रयत्न करावे. तुमसर सिटी हॉस्पिटला वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रूग्णालय यांनी भेट देवून कारणे पाहावी. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अनुदान आवश्यक व तातडीची औषधे घेण्याकरिताच वापरावी असे जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर म्हणाले. 

बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. डॉ. मिलिंद शामकुवर, जिल्हा समन्वयक डॉ. विश्वदिप नागस्कर, वैद्यकिय अधिक्षक साकोली डॉ. संदिप गजभिये, तुमसरचे डॉ. धिरज लांबट, पवनीचे डॉ. एच.डब्लू. दिघोरे उपस्थित होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours