अनुसूचित जातीच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेध मुख्यमंत्र्यांना निवेदन.......... भंडारा... अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमांच्याचे विदर्भध्यक्ष सुरज परदेशी, विदर्भ कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे ,नितेश बोरकर शाहीर प्रकाश नाकतोडे , नम्रता बागडे, अजय वासनिक ,यांनी अप्पर जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,समाज कल्याण आयुक्त पुणे, नागपूर ,यांना निवेदन पाठविण्यात आले की, अभियांत्रिक शिक्षण घेत असलेल्या आणि शिक्षण पूर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना दोन वर्षापासून महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती पाठविलेली नाही .त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना कॉलेज कडून आवश्यक असलेले कागदपत्र दिले जात नाही. प्रथम फीस भरा नंतर कागदपत्र देऊ असा तकादा कॉलेजने लावलेला आहे. त्यामुळे अनुसूचित जातीचे हजारो विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित झाले आहे. याकडे संबंधित अधिकारी कानाडोळा करीत आहेत व महाराष्ट्र सरकार हेतूपुरस्पर अनुसूचित जातीच्या मुलांवर अन्याय करीत आहे. म्हणून या घटनेचा निषेध करून निवेदन देण्यात आले की, अनुसूचित जातीच्या मुलांची शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी. पुढील शिक्षणासाठी त्यांच्या मार्ग मोकळा करण्यात यावा . कोणत्या मुलाला शिक्षणापासून वंचित करू नये. हेतू पुरस्कर अनुसूचित जातीच्या मुलांना वेठीस धरून त्यांचे जीवन बरबाद करणे बंद करावे. मुलांचे कागदपत्र त्यांना मिळवून देण्यात यावे .जे कॉलेज कागदपत्र देत नाही त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे
.
Post A Comment:
0 comments so far,add yours