बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
*चिचाळ गावात बिबट्याची दहशत
*नागरिकांत भीतीचे वातावरण
*हिंस्त्र वन्य प्राण्याचे बंदोबस्त करण्याची मागणी
लाखांदूर प्रतिनिधी
लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील सुरेश कुलसुंगे यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळी वर दि.०१/०९/२०२३ ला रात्री १०.३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक शेळी ठार मारल्या मुळे कुळसूंगे यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांना वण विभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार सुरेश कुळसुंगे हे अल्प भूधारक असून शेतीला पूरक जोड धंदा म्हणून त्यांच्याकडे काही शेळ्या व गायी आहेत त्यावर ते आपली उपजीविका करीत आहेत.सुरेश कुळसुंगे हे चिचाळ येथील सरपंच आहेत. काल रात्री १०.३० च्या सुमारास बिबट्याने शेळी वर हल्ला केला असता गोठ्यातील गायीच्या हंबरड्याने नेमक काय झालं हे पाहण्यासाठी उठले असता बिबट शेळी वर बसून असल्याचे दिसताच त्यांनी आरडा औरड करताच बीबट पडून गेला. शेळी जवळ गेले असता शेळी मृत पडून होती. याची माहिती वण विभागाला देण्यात आली वण विभाग अधिकारी एस. ए. नरवडे यांनी घटनस्थळाला भेट देऊन पंचनामा केला असता घटनास्थळी बिबटयाचे पंजे व शेळीच्या शरीरावर बिबटयाच्या खुणा आठडून आल्या.
वण विभागाने परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात हिंस्त्र प्राणी सोडले आहेत परंतु त्यांना जंगलात भक्ष मिळत नसल्यामुळे त्यांनी गावाच्या दिशेने येणं सुरू केल्यामुळे परिसरातील गावांत बिबट्यांची दहशत वाडली आहे. आज शेळी तर उद्या मनुष्यावर पण हल्ला होऊ शकतो या भीतीने रात्री गाव ७.३० वाजताच शांत होऊन जातो.
या आधी सुद्धा गावात येऊन बिबट्याने कितरी शेतकऱ्यांच्या शेड्या. गायी मारल्या असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वण विभागाने या हिंत्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा व सुरेश कुळसुंगे यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत
Post A Comment:
0 comments so far,add yours