जे. एम. पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा 


भंडारा:- स्थानिक जे. एम. पटेल  महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त राष्ट्रीय क्रिडा दिवसा निमित्त खेळाडुंचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 



           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शर्मा, समन्वयक डॉ. कार्तिक पन्नीकर, डॉ. शाम डफरे, डॉ. विनी ढोमणे उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्यामुळे हॉकी खेळाला अत्यंत लोकप्रिय बनविले आणि १९२८, १९३२, व १८३६ च्या  कामगिरीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांना हॉकीचे जादूगर का म्हणतात व त्यांना मेजर पदवी कशी मिळाली तसेच त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या नावाने भारत सरकार द्वारा विविध खेळाडू, प्रशिक्षक यांना राष्ट्रीय खेल अर्वाड दिल्या जातो. तसेच विविध प्रकारच्या खेळामुळे विद्यार्थीचे शारीरीक, मानसीक व बौद्धीक विकास तर होतोच त्याबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा होत असतो असे मत प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी व्यक्त करून विद्यार्थींना विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. 

      या दिनानिमित्य महाविद्यालयात विविध खेळाचे आयोजन करण्यात आले त्यात पारपांरिक खेळ कबड्डी, लंगडी, रस्सा खिच, लाग जम्प, शॉटपुट, इत्यादी खेळाचा क्रिडा विभाग द्वारा आयोजन करण्यात आला.

       याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व आंतर विद्यापीठ खेळाडू २८ विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

        त्यावेळी डॉ. प्रताप पटेल, डॉ. भावना राव, डॉ. विजया कन्नाके, डॉ. प्रशांत वालदेव, प्रा. भोजराज श्रीरामे, प्रा. पद्ममावती राव, डॉ. जितेंद्र किरसान, अनिल नवलाखे, डॉ. नैयना सोनवाने, डॉ. पालीवल, डॉ. भावना, डॉ. देवकते, प्रा. संदीप राहुल, डॉ. प्रदीप पटेल, डॉ. अजय देवकाटे, प्रियंका शर्मा, जयप्रकाश मतराम उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे संचालन डॉ. रोमी बिष्ट व प्रास्तविक क्रिडा विभाग प्रमुख डॉ. भिमराव पवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आर्या तुमसरे हिने मानले.

        कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता  महाविद्यालयातील प्राची चटप, मिताली गणवीर, दुर्गेश घुमरे, विवेक चटप, रविशंकर कनोजे, दर्शना ठाकरे, उमेश गोमासे, केतन खोब्रागडे, नशीब उके, दिव्या काकडे, नंदिनी प्रसाद, साक्षी बुराडे, कार्तिक शेंडे, कौशिक साकुरे, रूपाली बावनकर, अश्विनी हजारे, साहिल सार्वे, आकाश उके इत्यादी विद्यार्थि - विद्यार्थिनी तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक गण, शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours