संदिप‌ क्षिंरसागर   जिल्हा प्रतिनिधि  रिपोर्टर प्रिस (राजकुमार)दहेकर
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका येथील मुंडीपार, बाह्मणी/खैरी येथील ४७६ एकर जागा २०१३ साली, शासनाने शेतकऱ्यांकडून भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) ह्या प्रकल्पासाठी अधिकग्रहीत केली. पण अद्याप ही सदर जागेवर प्रकल्प तयार झाला नाही.


भेल प्रकल्प सुरू व्हावं, ह्यासाठी भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करीत आहेत.

आज आंदोलनस्थळी भेट देत, ह्या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत वंचित बहुजन युवा आघाडी भंडारा जिल्ह्याच्या वतीने समर्थन जाहीर केला.

ह्यावेळी जिल्ह्याचे प्रभारी मा. भगवानजी भोंडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशजी खंगार, डॉ. अविनाश नान्हे, मुकेश मेनपाले, परमानंद मेनपाले आदी उपस्थित होते.

भेल प्रकल्प सुरू करा, नाहीतर शेतकऱ्यांना जमीन परत करा. अन्यथा येणारा काळात वंचित बहुजन आघाडी ह्याविषयी तीव्र आंदोलन करणार आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours