नागपूर - दिल्लीत २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. देशाच्या लोकशाहीला वाचविण्यासाठी पाठिंबा दिल्याचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, आणि निवडणूक कायद्यात सुधारणा करावी, या अण्णा हजारे यांच्या मागण्या आहेत.  अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून सत्ताधारी भाजप प्रयत्न करत आहे. नुकतेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली. मात्र अण्णा हजारे आंदोलनाच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनावेळी केलेल्या मागण्या काँग्रेसने स्वीकारल्या होत्या. अण्णांच्या २३ मार्चच्या होणाऱ्या आंदोलनावर काही संघटना शंका व्यक्त करत आहे. मागील आंदोलनाच्या वेळी अशा शंका व्यक्त केल्या जात नव्हत्या. संघटना काहीही शंका घेत असल्या तरीही अण्णांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे.  या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मंचावर जाणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच अण्णा हजारे यांनी आंदोलनात सहभाग मागितला तर सहभागीही होणार आहोत, अशी  त्यांनी माहिती दिली.गेल्यावेळेस अण्णांनी दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन केले होते. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपने अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सत्ताधारी भाजपच्या विरोधात अण्णा हजारे आंदोलन करत असताना काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे.दरम्यान अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्यावरून काँग्रेस भाजप सरकारला घेरण्याची तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours