17 एप्रिल : नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये दोन गावातील शाळेत वाटप केलेला चिवडा आणि बिस्किटं खाल्याने 70पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. भोकर तालुक्यातील हाडोळी आणि कामनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ल्ड व्हिजन नामक सामाजिक संस्थेने चिंतन शिबीर घेतले. याच कार्यक्रमात चिवडा आणि बिस्कीट वाटप करण्यात आली होती.
चिवडा आणि बिस्कीट खाल्याने विद्यार्थ्यांना उलट्या होऊन त्रास सुरू झाला. दुपारपासून त्रास सुरू झाल्याने एकापाठोपाठ अनेक विद्यार्थी भोकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी येत होते. दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने बालकांना विषबाधा झाल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आलं.
ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या बालकांना भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. रात्री 10 वाजेपर्यंत तबबल 70पेक्षा अधिक विद्यार्थी दाखल झाले होते. या सर्वांवर उपचार केल्यानंतर रात्री उशिरा सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours