नागपूर, 17 एप्रिल : दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह बिंझानी काॅलेजच्या मागे असलेल्या बंद पडलेल्या स्विमिंग टँकमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. साहिल खान असं या मुलाचं नाव असून वकीलपेठ मध्ये राहायचा.
शनिवारी साहिल बेपत्ता झाल्याची तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती आणि पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. साहिल आपल्या मित्रासोबत याच बंद पडलेल्या स्विमिग टँक परिसरात खेळायला जात असल्याने त्याचे नातेवाईक शोधत या ठिकाणी आले तेव्हा त्यांना त्यांना या ठिकाणी साहिलचे कपडे दिसले.
पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी आले त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाने साहिलचा मृतदेह या बंद पडलेल्या स्विमिंग टँक मधून शोधून काढला. साहिल पोहतांना बुडुन मृत्यू झालं की यात काही घातपात आहे याचा शोध पोलीस घेताहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours