भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवार नाना पटोले???
रिपोर्टर दीपक वाघमारे
एफ्रिल महिना संपत आलेला आहे त्यामुळेच उन्हाचे चटके सुद्धा जोमात बसने सुरू झालेले आहेत. ह्याच  उन्हाच्या चटक्यासोबत पोटनीवडणुकीची तयारी  लवकरच सुरू होईल.भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीची जयंत तयारी 3 मे पासून सुरु होणारच.
        पोटनिवडणुकित  कोणत्या पक्षाचे कोण  उमेदवार राहतील हे अजून स्पष्ट झालेले नाही 
तरी पण दोन्ही जिल्ह्यात आतापासूनच पानटपरी पासून ते शासकीय कार्यलयात सुद्धा पोटनिवडणूक लढण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्यक उमेदवारा बद्दल फावल्या वेडेत राजकीय गप्पा रंगतांना दिसून येत आहेत.
पोटनिवडणुकीत सर्वप्रथम शिवसेने ने आपला उमेदवार राजेंद्र पटले यांना घोषित केले आहे त्यामुळेच काही भाजप च्या उमेदवारांनी डोक्यावर हात ठेवला आहे.लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून पंतप्रधान मोदीजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर सतत माजी खासदार तोफ डागत आहेत त्याला कारणे पण तसेच आहेत ते फक्त कोणत्याही पक्षाशी संभध नसलेला सामान्य वेक्तीच समजू शकतो. ज्या भरोष्यावर देशात आणि राज्यात भाजप ची सत्ता आली त्या सर्व घोषणा आता केराच्या टोपलीतच जमा झालेल्या आहेत .ओबीसी मंत्रालय ,  शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असोत किंवा बहुजनांचे विविध प्रश्न असोत हे सर्व विषय सरकार स्थापने नंतर बंद झालेत.नानाभाऊ पटोले  यांनी हेच मुद्दे सरकारच्या वेळोवेळी लक्षात आणून द्यायचा प्रयन्त केला होता पण बहुजनांचा आवाज ऐकणार ते भाजप कसली त्यामुळेच नानाभाऊ पटोले यांनी राजीनामा दिला . साधा ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा द्यायला मोठा काळीज लागतो मग नानाभाऊ पटोले यांनी तर खासदारकीच राजीनामा दिला. 
       असो काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे परंतु ही सीट काँग्रेस च्या कोट्यात जाणार की राष्ट्रवादी च्या कोट्यात जाणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.पण जर काँग्रेस च्या कोट्यात गेली तर  काँग्रेस कडून नानाभाऊ पटोले यांच नाव फायनल झाले आहे आणि राष्ट्रवादी कडून सुनील भाऊ फुंडे,मधूकरजी कुकडे , विजय शिवणकर यांचे नाव आघाडीवर आहे.भाजप कडून खुशाल बोपचे, हेमंत पटले , शिशुपाल पटले यांचे नाव चालू आहे पण मुख्यमंत्र्याच्या जवळचे असलेले परिनय फुके यांनी तबियतीचा कारण पुढे करून माघार घेतली असी माहिती मिळाली आहे त्यांना पण माहीत आहे की आगीत हात कोण टाकेल म्हणून ते पण शांत झाले असतील असे वाटत आहे. मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्यातील भाजप च्या नेत्यांची बैठक सुद्धा घेतली.
        ज्या नाना पटोले यांनी 2009 लोकसभा निवडणुकीत अपक्ष राहून सुद्धा अडीच लाखावर मत घेतले होते व भाजप चे तत्कालीन खासदार शिशुपाल पटले तीन नंबर वर फेकल्या गेले होते तो नाना पटोले रुपी नावाचे वादळ शांत होण्याचा नाव घेत नाही आहे त्यामुळेच दिल्ली पासून मुंबई पर्यन्त चे सर्व भाजप चे नेते कोमात गेल्याचे दिसून येत आहे त्यांना तोडीस तोड देणारा उमेदवार अजूनपर्यंत भाजप ला भेटत नसल्याचे दिसून येत आहे. भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणुक ही भाजप साठी प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे. मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्याचे राजकीय चर्चा सत्राचे ठिकाण असलेले त्रिमूर्ती चौकातील महसूल कॅन्टीन येथे नाना पटोले यांना शह देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे त्याला कारण असे की राजकीय वर्तुळात केंद्रात व राज्यात फेरबदल होण्याची चर्चा.देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा लढवून त्यांना दिल्लीत पाठविण्याची तयारी व मराठा समाजाचा रोष थांबिण्यासाठी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री करणे हा आहे पण नाना पटोले हा चक्रीवादळ स्वतः मोदीजी आले तरी थांबविणे पाहिजे तेवढ सोपी नाही  अस भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सामान्य लोकांचे मत विचारल्यानंतर लक्षात येते.
         राष्ट्रवादी कडे जर भंडारा गोंदिया पोटनीवडणुकीची सीट गेली तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे यांचं नाव आघाडीवर आहे ते पण वरचढ ठरू शकतात कारण त्यांनी प्रत्यक पक्षातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध अबाधित  ठेवले आहेत त्यामुळे काँग्रेस सह सर्व पक्षाचे नेते त्यांचा प्रचार योग्य रित्या करतील भाजप चे काही स्थानिक नेते त्यांच्या विरुद्ध प्रचार करू शकणार नाही हे पण तेवढेच खरे आहे आणि महत्वाची बाब म्हणजे नाना भाऊ पटोले यांच्याशी असलेले त्यांचे मैत्रीचे संबंध ! माजी आमदार मधुकर कुकडे यांची सुद्धा नाड सामान्य लोकांसोबत जडलेली आहे मागील 1 महिन्यापासून सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही जिल्हे त्यांनी पिंजून काढले आहे  व विजय शिवणकर यांचं सुद्धा नाव राष्ट्रवादी कडून चर्चेत आहे पण वेळेवर मात्र वर्षाताई पटेल यांना सुद्धा तिकीट मिळू शकेल कारण सामान्य लोकांमध्ये , महिलांमध्ये मिसळण्याची कला बघता त्यांनी दोन्ही  जिल्ह्यात आपला स्वतंत्र अस्तित्व निर्माण केला आहे आता संपूर्ण लक्ष भाईजि कडे लागला आहे कारण ते ज्यांना म्हणतील त्यांनाच तिकीट मिळेल.असो भर उन्हाळ्यात गावठी भाषेतील माट्या संपूर्ण भंडार गोंदिया जिल्ह्यात सतत 1 महिना फिरत राहणार आहे त्यामुळे सर्वांच्या हालचाली कडे बारीक लक्ष देणे गरजेचे आहे.नाना पटोले रुपी वादळ थांबिण्यासाठी भाजप ला तारेची कसरत करावी लागेल त्यासाठीच स्वतः मुख्यमंत्री ही पोटनिवडणूक लढणार का हा महत्वाचा प्रश्न जनमानसात पडलेला आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours