वरठी : महिलांसाठी राजकारणात ५० टक्के आरक्षण आहे. यामुळे राजकारणातील सर्वोच्च पदावर महिलांची संयाख्या जास्त आहे. पण सत्ताधारी महिलांच्या वर्चस्वावर असलेले पुरुषी वर्चस्व निर्णयात आड येतात. पण वरठीच्या सरपंच श्वेता येळणे याबाबद अपवाद ठरल्या आहेत. महिलांच्या आरोग्याशी जुडलेल्या व समाजात गैरसमज असलेल्या मुद्यावर न घाबरता सामाजिक कार्यकर्त्या सुचिता आगाशे यांच्या मदतीने गावातील शाळा-महाविद्यालयात सॅनिटरी मशीन लावण्याचा उपक्रम हाती घेतला. वरठी येथे पाच शाळा-महाविद्यालयात सॅनेटरी मशीन लावण्यात आल्या.
लवकरच उर्वरित शाळां व सार्वजनिक ठिकाणी मशीन लावण्याच्या उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी सनफ्लॅग कंपनीने हिरीरीने मदत केली. महिलांच्या स्वच्छता व आरोग्याबाबद अनेक समस्या आहेत. पुरोगामी देशात आजही महिलांच्या आरोग्याशी जुडलेल्या अनेक समस्या बाबद सार्वजनिक चर्चा करता येत नाही. याबाबद अनेक गैरसमज तेवढेच मानसिक गुलामी पाहावयास मिळते. यात मुलींना येणारी मासिक पाळीचा समावेश आहे.
महिलांच्या आरोग्याशी जुडलेले आहे. याकाळात महिलांना आधाराबरोबर सहानुभूतीची जास्त गरज असते. प्रत्येक महिलांच्या जीवनातील हा आवश्यक घटक आहे. पण आजही महिलाही सार्वजनिक रित्या बोलायला तयार नाहीत. मासिक पाळीचा विषय म्हणजे अतिसंवेदनशील असल्यासारखा हाताळण्यात येतो. पण यामुळे महिलांना होणार त्रास कुणीही समजून घेण्यास तयार नाही.

विज्ञानाच्या युगात शिक्षित समाजही याबाबद अशिक्षित असल्यासारखे वागून महिलांची उपेक्षा करताना आढळतात.

सरपंच श्वेता येळणे यांना सामाजिक कायार्ची आवड होती. सरपंच झाल्यावर ही जबाबदारी अजून वाढली. महिलांच्या समस्या व आरोग्य विषयावर साकोलीच्या सुचिता आगाशे या अनेक दिवसापासून कार्य करतात. जिल्ह्यातील महिला सरपंच व पदाधिकऱ्यांशी चर्चा करून महिलांना मासिक पाळी दरम्यान मुली व महिलांना होण्याºया त्रासाबाबद उपाय सुचवले. त्यांनी अनेक ठिकाणी मशीन लावल्याचे उदाहरण देऊन गावात ही सुविधा उपलब्द व्हावी यासाठी मदतीचे आवाहन केले. पण प्रतिसाद मिळाला नाही. राजकारणात निर्णय घेण्याच्या सर्वोच्च पदावर महिला मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. पण सुचिता आगाशे याना महिलांच्या समस्याबाबद महिलाच अनुउत्सुक असल्याचे आढळले. त्यांनी सरपंच श्वेता येळणे यांच्याशी भेटून उपक्रम समजावून सांगितले. प्रोजेक्ट तयार केला. याकरिता ग्राम पंचायत स्तरावर निधी अपुरा असल्याचे निदर्शनास आले.

निधी शिवाय काम होणार नाही याची जाणीव होती. ग्राम पंचायत स्तरावर निधी नसल्याने प्रोजेक्ट पूर्ण कसा करायच्या या विवंचनेत होत्या. कोणत्याही परिस्थितीत गावात सॅनेटरी मशीन लावायच्या अशा निर्धार त्यांनी केला होता. आर्थिक मदतीसाठी त्यांनी सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापनाकडे धाव घेतली. जानेवारी महिन्यात कंपनीला प्रोजेक्ट सादर करून विषय पोटतिकडीने लावून धरला. सरपंचाची आग्रही भूमिका व निर्धार याला सनफ्लॅग व्यवस्थापनाने अपेक्षित सहकार्य करण्याचे ठरविले. सी एस आर निधीतून गावात मशीन लावण्याचा मागणी मंजूर केली. गावात पाच सॅनेटरी मशीन लावण्यात आल्या असून याकरिता स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी योजना पूर्णत्वास नेली.

येळणे यांच्या पुढाकाराने वरठी येथील सनफ्लॅग स्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, नवप्रभात कन्या शाळा, स्वर्गीय पार्वतीबाई मदनकार महाविद्यालय व नवप्रभात कनिष्ठ महाविद्यालयात मशीन लावण्यात आल्या. नुसती मशीन न लावता त्या स्वत: व सामाजिक कार्यकर्त्या सुचिता आगाशे यांनी प्रत्येक शाळेत भेटी देऊन मुलीच्या मनात असलेली भीती व न्यूनगंड बाजूला सारण्यासाठी जागृती केली. सरपंच येळणे यांनी विकासाचा नवीन आदर्श राजकारण्यापुढे ठेवला आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours