23 एप्रिल : विश्व हिंदू परिषदेचा सदस्य म्हणवून घेणाऱ्या तरुणाने एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. त्याने या ट्विटमध्ये ओला कॅबची सवारी रद्द केली, कारण गाडीचा चालक त्याला मुस्लिम मिळाला होता. त्याच्या या कृत्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
स्वत: हिंदू विचारक म्हणवणाऱ्या अभिषेक मिश्रानं सांगितलं की, 20 एप्रिलला त्यानं कॅबचा रस्ता रद्द केला होता. कारण जिहादींना पैसे द्यायचे नव्हते. या ट्विटसह अभिषेक मिश्राने एक स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे. ज्यामध्ये ड्रायव्हरचं नाव मसूद आलम असं लिहिलं आहे
अभिषेक मिश्राच्या ट्विटर अकाउंटवर 14 हजारांहून अधिक फॉलोअर्सअसून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांचाही समावेश आहे.
या युवकाने त्याच्या फेसबुक अकाउंटवर लिहिलं की तो अयोध्येचा रहिवासी आहे आणि लखनौमध्ये आयटीमध्ये काम करतो. त्यानं दावा केला आहे की, तो व्हीएचपीचा आयटी सेल हाताळतो आणि वाणिज्य मंत्रालयाचा प्रकल्प व्यवस्थापक म्हणून देखील काम केलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours