अध्यक्ष सुनील मेंढे सहित १८नगर सेवक अपात्र।
सुका मुका देशकर यांची याचिका
भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भंडारा क्रांती या सप्ताहिकाचे माजी संपादक सुकराम मुका देशकर भंडारा नगर परिषदचे विद्यमान अध्यक्ष सुनील मेंढे व इतर १८ नगर सेवकाविरुद्ध जिल्हाधिकारी भंडारा यांचे न्यायालयात याचिका दाखल करून या सर्वांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अंहर्ता अधिनियम १९८६ चे कलम ३(१) व कलम ३(२) चे उल्लंघन केल्याबद्दल अपात्र घोषित करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे अपात्र ठरणारे अध्यक्ष व सर्व १८ नगर सेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत
भंडारा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दी १८ डिसेंबर २०१६ ला घेण्यात आली होती या निवडणुकीत थेट अध्यक्ष पदी भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे निवडून आले तसेच एकूण ३३ सदस्य संख्या असलेल्या या नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे-१५ अपक्ष-४ व इतर पक्ष्याचे -१४ सदस्य निवडून आले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार परिनय फुके व अध्यक्ष सुनील मेंढे यांनी त्यापैकी ३अपक्ष सदस्यांना आपल्या जाळ्यात ओढून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुनील मेंढे व १५ सदस्य आणि ३अपक्ष्य असे मिळून १८ नगर सेवकांचे भंडारा न प भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडी या नावाची नवीन आघाडी दि ६/१/२०१७ ला बनविली ही आघाडी बनविताना या सर्व १९ सदस्य कडून स्टॅम्प पेपर वर अशी आघाडी स्थापन केल्याचे शपथ पत्र तय्यार करून ते जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कडे सादर करण्यात आले
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अंहर्ता अधिनियम १९८६ चे तरतुदी नुसार निवडणुकी नंतर अशी आघाडी बनविता येत नाही तशी आघाडी बनविल्यास या आघाडीचे सदस्यत्व स्वीकारणारे सर्व सदस्य अध्यक्ष नगर सेवक पदावर राहण्यास अपात्र ठरतात मा जिल्हादजीकरी भंडारा यांनी प्रथम ही बाब आमदार परिनय फुके व अध्यक्ष सुनील मेंढे यानच्या निदर्शनात आणून दिली परंतु त्यांनी त्या कडे दुर्लक्ष करून आणि राजकीय दबाव तंत्राचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या आघाडी ची नोंद करून घेतली ज्या दिवशी ही आघाडी बनविण्यात आली त्याच दिवशी म्हणजे च ६/१/२०१७ रोजी आघाडीचे सदस्य बनलेले १८ सदस्य व अध्यक्ष नगर सेवक पदावर राहण्यास अपात्र ठरलें
तसे पाहता जिल्हाधिकारी भंडारा यांनी त्याच वेळी स्वतःच सुमोटो कारवाई करून अध्यक्ष सुनील मेंढे व १८ सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरविण्याची आवश्यकता होती परंतु जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राजकीय दबावापोटी आजपर्यंत तसे केले नाही अखेर सामाजिक कार्यकर्ते व भंडारा क्रांती या साप्ताहिकाचे माजी संपादक सुकराम देशकर यांनी दि १२ एप्रिल २०१८ रोजी मा जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडून या संबंधी याचिका दाखल करून अध्यक्ष सुनील मेंढे आणि इतर १८सदस्य अपात्र ठरविण्याची मागणी करताच जिल्हा प्रशासनाची झोप उडाली व जिल्हाधिकारी यांनी तशी कार्यवाही सुरू केली
Post A Comment:
0 comments so far,add yours