नांदेड, 12 मे : लातूर-नांदेड रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण अत्यवस्थ तर 15 जण जखमी आहेत. शिरुर ताजबंद ते मुखेड रस्त्यावर आयशर टेम्पो आणि टँकरची समोरासमोर धडक झाली.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व मृत औसा तालुक्यातील खरोसा येथील रहिवासी आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours