चंद्रपूर, 12 मे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात प्रचंड ऊन तर काही भागात पाऊस अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे. आज राज्यातलं सगळ्यात जास्त तापमान विदर्भात चंद्रपूरमध्ये नोंदवण्यात आलं. आज चंद्रपूरमध्ये ४७.३ इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.
राज्याची उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. नागपूरमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वरती गेलंय. वाढत्या उष्णतेमुळे नागपुरात उष्माघातानं 6 जणांचा बळी गेलाय, तर मागील महिनाभरात तब्बर 78 जणांना उष्माघात झाल्याचं आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आलंय.
Post A Comment:
0 comments so far,add yours