पुणे, 18 मे : जिल्ह्यातील भिगवनजवळ आज झालेल्या एका भीषण अपघातात पिंपरी चिंचवडचे रहिवासी असलेल्या गायकवाड  कुटुंबातील तब्बल पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये.
मृतांमध्ये एका चार वर्षीय चिमुकल्याचाही समावेश असून, इतर दोन जण जखमी असल्याचं कळतंय. गायकवाड़ कुटुंबीय गुरुवारी तुळजापूरला गेले होते. तिथून देवदर्शन करून परतत असताना गाडीचं टायर फुटून हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आलीये.
मिळालेल्या माहिती नुसार या अपघातात, प्रकाश  गायकवाड, सुनिता गायकवाड,संदीप गायकवाड, शितल गायकवाड आणि पाच वर्षाचा  चिमुकला आभिराज गायकवाड याचा मृत्यू झाला आहे तर याच कुटुंबातील प्रमोद गायकवाड आणि हेमलता गायकवाड हे जखमी झाले आहेत. या घटनेतील घटनेतील मृत संदीप  गायकवाड यांचा दुसरा सात वर्षीय मुलगा हा मामाकडे गेल्यामुळे तर प्रकाश गायकवाड यंचे वृद्ध माता पिता घरी असल्यामुळे वाचले आहेत.
उद्या सकाळी घटनेतील मृतकांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, ही घटना कळताच गायकवाड़ कुटुंबीय ज्या युमनानगरमध्ये वास्तव्यास होते तिथे शोककळा पसरली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours