कोल्हापूर, 18 मे : कोल्हापुरच्या शाहुवाडी पोलीस ठाण्यातले कर्मचारी झोपेत असताना, कोठडीचे गज वाकवून चार आरोपी फरार झाल्याचं समोर आलंय.
कैदी पळून गेल्यानं झोपा काढणाऱ्या पोलिसांची आता झोप उडालीय. पलायन केलेल्या कैद्यांवर घरफोडी, दरोडे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. फरार कैद्यांना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आलीय. मात्र या घटनेमुळे कोल्हापूर पोलिसांची अब्रू धुळीला मिळालीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Post A Comment:
0 comments so far,add yours