मुंबई, 14 मे : मनसेतून शिवसेनेत सामील झालेल्या 6 नगरसेवकांचं आज भवितव्य ठरणार आहे. आज कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात याची सुनावणी होणार आहे. मनसेतून शिवसेनेत सामील झालेल्या ६ नगरसेवकांच्या संदर्भातील सुनावणी आज कोकण विभागीय आयुक्तांसमोर आज होणार आहे. या नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावं असा अर्ज मनसेतर्फे करण्यात आली आहे त्यावर ही सुनावणी होणार आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचं टायमिंग साधत ही सुनावणी आज होत असल्याची चर्चा आहे. कारण ज्या दिवशी पालघरचे भाजपचे माजी खासदार स्वर्गीय चिंतामण वानगा यांचा मुलगा श्रीनिवास वानगा यांची उमेदवारी शिवसेनेने घोषीत केली त्याच दिवशी या सुनावणीची नोटीस काढण्यात आली. तर आज पालघर पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी सुनावणी ठेवण्यात आल्यानं भाजप शिवसेनेला कोंडीत पकडत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours