लोणावळा, 14 मे : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात झालाय. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात घडला. या अपघातात प्रार्थना बेहेरेचा उजवा हात फ्रॅक्चर झालाय. तर अनिकेत विश्वासराव किरकोळ जखमी झालाय.
टोयॅटो फाॅर्च्युनर गाडीतून हे कलाकार प्रवास करत होते. एका टेंपोला ओव्हरटेक करताना ही कार डिव्हायडरवर आदळली.
या अपघाताता प्रार्थनाच्या हेअर ड्रेसरला जास्त दुखापत झालीय. उपचारासाठी तिला लोणावळ्यात रुग्णालयात दाखल केलंय.प्रार्थना आणि अनिकेत मुंबईहून कोल्हापूरला मस्का सिनेमाच्या प्रमोशनसाठी जात होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours