भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सपादीका.... सुनिता परदेशी

             भंडारा दिनांक २४/०५/२०१८ ला भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार व केंद्र सरकार द्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेल च्या अवाढव्य किमतीच्या विरोधात निदर्शने केली व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद आहे  कि ,संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलच्या किमती ह्या आपल्या ऐतिहासिक किमतीला वाढलेल्या असून त्यामुळे सर्वसामन्य माणूस होरपडून निघाला आहे.आजचे पेट्रोल व डिझेल चे दर हे आज पर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त दर आहेत. पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर गेलेल्या असून त्यामुळे महागाई आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे शेतकरी मध्यमवर्ग सर्वसाधारण जनता यांचे कंबरडे मोडलेले आहेत . पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाईचा भडका उडणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमती कमी करून सामान्य जनतेला दिलासा दयावा अन्यथा जनतेच्या रोषाला सामोर जावे लागेल.या प्रसंगी प्रेमसागर गणवीर अध्यक्ष भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी,दिपक गजभिये,धनराज साठवणे,शंकर राऊत,आणिक जमा पटेल, अजय गडकरी, अवैस पटेल,सुनील गिर्हेपुंजे,मंगेश हुमणे, प्रशांत देशकर,प्रा.टी.डी.मारबते,संजय वरगनटीवार,प्रकाश डोनेकर,सुकराम देशकर,रोशन दहेकर, विनय बागडे,सचिन गिरहेपुंजे, नाहीद परवेज,अंकुश वंजारी,हेमंत मलेवार,हरिराम निमकर,भोलाराम साठवणे, प्रदीप वाडीभस्मे, गणेश लीमजे मोहाडी,जिवन भजनकर,जागेशवर बडगे इत्यादि कॉंग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours