रिपोर्टर:हर्षिता ठवकर

पालांदूर : मित्राच्या लग्नावरुन परतीच्या प्रवासात शिवणी/बांध वळणावर दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीचालक भुपेश उर्फ भूषण प्रकाश तलमले (२६) पालांदूर यांचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.
मित्राच्या लग्नाकरिता भूषण हा एकटाच मित्राच्या दुचाकीने अर्जुनी येथे गेला होता. परतीच्या प्रवासात शिवणीबांध वळणावर रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अपघात झाला. ही घटना शनिवारला घडली. रविवारला सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्याच्याजवळ मिळालेल्या पत्यावरुन घरच्यांशी संपर्ककरुन घटनेची माहिती देण्यात आली. प्रथम भंडारा व नंतर नागपूरला उपचार करण्यात आले. पण भूषणचा प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. अपघात कसा घडला हे कळू शकले नाही. तलमले कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. वडील प्रकाश तलमले हे पोलीस विभागात सेवेत आहेत. भूषण हा मनमिळावू स्वभावाचा सुशिक्षीत तरुण असून त्याने शुध्द पाण्याच्या स्वयंरोजगार उभारला होता. त्याचे मागे वडील, आई, बहिण व असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10 वाजत वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours