ग्रामपंचयतीचे दुर्लक्ष
* माउली भोजन पार्टीचे नावीन्य उपक्रम.
चिचाळ: चिचाळ येथील स्मश्यान भुमित अंतविधीला येणाऱ्या नागरिकांसाठी विसावा म्हणून एकही वृक्ष नाही या त्यातच ह्या उन्हामुळे नागरिकांचे हाल बेहाल होत आहेत. त्यामुळे चिचाळ गावातील रहिवासी त्रस्त झालेले आहेत व बहुतेक नागरिक अंतीमविधीलाही जाण्याच्या क्षमतेत नाही व याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने चिचाळ गावातील माउली भोजन पार्टीच्या तरुणांनी स्व:खर्चाने 40 वृक्षांचे वृक्षलागवड करून लोखंडी कठडे लावलेत व या भर उन्हात दैनंदिन चार युवक वृक्षांना पाणी देण्याचे कार्य करीत असल्याने गावात या तरुणांचेसर्वत्र कौतुक होत आहे.
प्रवीण बिलवणे, मयूर बिलवणे, मोहित बिलवणे, सतीश कटेखाये, बादल डोकरीमारे, अविनाश जिभेकाटे, प्रणय कटेखाये, विशाल मोहरकर, इत्यादी तरुन या कार्यामध्ये कार्यरत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours