दिल्ली, 23 मे : दिल्लीतील शास्त्रीनगर मेट्रो स्थानकवरील एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आल आहे. एक 21 वर्षी तरुण मेट्रोच्या ट्रॅकवर उतरून प्लॉटफार्म पार करत होता. पण ड्रायव्हरने वेळेवर ब्रेक मारल्याने थोडक्यात त्या तरुणाचा जीव वाचला.
ज्या प्लॉटफार्मवर तो चढणार होता त्या प्लॉट फोर्मवर मेट्रो थांबली होती. अचनक ही मेट्रो सुरू झाल्यानं त्या तरुणाने प्लॉटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रेन इतकी जवळ होती की तो प्लॉटफॉर्मवर चढण्या आधीचं ट्रेन त्याच्या जवळ आली.
मात्र मेट्रोच्या चालकाने प्रसंगावधान राखून मेट्रोल थांबवली आणि त्या तरुणाचे प्राण वाचवले. या प्रकरणी 21 वर्षीय मयुर पटेलला अटक करण्यात आली. त्याची ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी त्याने एका प्लॉटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॉटफॉर्मवर कसं जायचे हे माहीत नसल्याने असे केल्याचे सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours