नागपूर: सामान्यांना दोन तीन महिने आधीपासून रेल्वेचे तिकीटं काढूनही ते कन्फर्म होत नसतांना तिकीटांचा काळाबाजार करणारे एक रॅकेट रेल्वे सुरक्षा दलानं उद्धस्त केले आहे. आंतरराज्यीय रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे तिकीटं या टोळीनं प्रवाशांना चढ्या दराने विकले आहेत.
आता ही सर्व तिकीटं रद्द करण्यात आली आहेत. या रॅकटचा म्होऱ्हक्या जितेंद्र वासवानिला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. भारतीय रेल्वेच्या प्रिमिअम तात्काळ सेवेतून अवैध ओळखपत्राच्या आधारावर तिकटं काढून त्याचा काळाबाजार करणाऱ्या जितेंद्र वासवानी याची नागपूरच्या खामला परिसरात ट्रॅव्हल एजेन्सी होती.
पाच एजंट्सच्या माध्यमातून त्यानं दोन, तीन राज्यांमध्ये कोट्यवधींच्या रेल्वे तिकीटांचा काळाबाजा केला होता. या घोटाळ्याची पुर्ण पाळेमुळे शोधून काढणार असल्याचं रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केलं. प्रवाशांनी अशा काळाबाजार करणाऱ्यांची माहिती 182 या क्रमांकावर देण्याचे आवाहन केलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours