11 मे : एका बाजुला राज्यात तापमानाचा पारा वाढत असताना सांगली शहरात मात्र गारांसह अवकाळी पाऊसानं हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शहरात अचानक पाऊस झाल्यानं जनजीवन विसखळीत झालं आहे.
मागील काही दिवसापासून सांगलीचं तापमान 40 अंश्याच्या आसपास पोहोचलं होतं. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून सांगलीकर चांगलेच सुखावले आहेत तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या दुष्काळी भागातील अनेक गावांना देखील अवकाळी पावसानं झोडपलं आहे.
अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घराचे पत्रे उडून गेले आहेत. या पावसामुळे पिकांना देखील नुकसान झालं आहे. सातारा शहराच्या काही भागात देखील संध्याकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours