मुंबई, 11 मे : दुबई, सिडनी, सिंगापूरप्रमाणेच गोरेगावमध्ये पालिकेने स्कायवॉकच्या खांबांवर 'व्हर्टिकल गार्डन' साकारलं आहे. गोरेगाव स्टेशनला पश्चिमेकडून पी दक्षिण विभाग कार्यालयाकडे जाणाऱ्या स्कायवॉकच्या पाच खांबांवर ७ हजार ४७६ रोपटी 'व्हर्टिकल' पद्धतीने लावली आहेत. यामुळे स्कायवॉकच्या खालचा परिसर हिरवागार आणि आकर्षक दिसू लागला आहे. 289722
विशेष म्हणजे ही रोपटी लावताना हिरव्या आणि बड्या पानांची आकर्षक रचना करण्यात आली आहे. या रोपट्यांमध्ये सिंगोनियम (Syngoniumed), मनी प्लांट (Moneyed Pledant), स्पिंग्री (Spingaried) या तीन प्रकारच्या झाडांची प्रत्येकी १ हजार ६८० रोपटी लावण्यात आली आहेत. तर पेन्डॅनस (Pendanueds) आणि सिक्रेशिया (Secedretieda) या प्रजातींची अनुक्रमे ९२४ आणि १ हजार ५१२ एवढी रोपटी लावण्यात आली आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडतेय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours