मुंबई, 25 मे : भारतीयांना इंधनदरांमुळे फटका बसत असला तरीही सलग 12व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सकाळी 6 वाजता पेट्रोलच्या दरात 36 पैशांची वाढ झाली. मुंबईत आज पेट्रोलचा दर आहे 85 रुपये 65 पैसे तर डिझेल 20 पैशांनी वाढल्यामुळे ते थेट 72 रुपये 96 पैसे, म्हणजे जवळपास 73 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
दरम्यान, इंधन दरवाढीवर दीर्घकालीन उपाय काढण्यावर काम सुरुय, एवढंच उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. पण वाढत्या इंधन दरवाढईमुळे देशभरात आता संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे. या इंधन दरवाढीचा सगळ्यात जास्त फटका हा सर्वसामांन्याना होताना दिसतो.
इंधन दर कमी करण्याचं काम तसं केंद्र सरकारवर आहे. मात्र, इंझनबोजा राज्यांवर थोपवण्याचं काम करतायत असं म्हणायला हरकत नाही. पण दुसरीकडे हम फिट तो इंडिया फिट असं म्हणत मोदी मात्र चॅलेंज गेम खेळत आहेत. दरम्यान, इंधनाला जीएसटीमध्ये आणण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण या सगळ्यातून आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईतले दर
दिवस दर वाढ
14 मे 82.65 ₹ 0.17
15 मे 82.79 ₹ 0.14
16 मे 82.94 ₹ 0.15
17 मे 83.16 ₹ 0.22
18 मे 83.45 ₹ 0.29
19 मे 83.75 ₹ 0.30
20 मे 84.07 ₹ 0.32
21 मे 84.40 ₹ 0.33
22 मे 84.70 ₹ 0.30
23 मे 84.99 ₹ 0.29
24 मे 85.29 ₹ 0.30
25 मे 85.65 ₹ 0.36
देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये आजचे दर पाहूयात...
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 85.65 73.20
नवी दिल्ली 77.83 68.75
नोएडा 78.35 68.95
भोपाळ 83.45 72.36
चेन्नई 80.80 72.58
बंगळुरू 79.10 69.93
हैदराबाद 82.45 74.73
पोर्ट ब्लेअर 67.06 64.42
Post A Comment:
0 comments so far,add yours