बीड, 23 मे : माजलगाव बीड येथील शहर पोलिस ठाण्याची महिला पोलिस ललिता साळवे हिला प्रदिर्घ संघर्षानंतर लिंगबद्दल करण्याची परवानगी पोलीस खात्याकडून परवानगी मिळाली आहे. ललिता आज सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग बदलाच्या उपचारासाठी दाखल झाली आहे.
ललिताचा ललीत होण्यासाठीचा हा प्रवास फार कठीण होता अशी माहिती लिलताचे मामा अर्जुन उजागरे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून शरिरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची इच्छा होती. यासाठी तिने पोलीस खात्याकडे परवानगी मागितली होती. मात्र, ललिता ही भरतीच्या वेळी महिला म्हणून भरती झाली असून लिंगबदल केल्यास पुरुष झाल्याने तिच्या नोकरीवर गदा येण्याची शक्‍यता होती. त्‍यामुळे ललिताने मुंबई उच्च न्यायालयात डॉ. अब्बास नक्वी यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.
शरिरात बदल करण्याचा नैसर्गिक अधिकार आसल्याने न्यायालयाने तिच्या लिंगबदलाला परवानगी दिली होती. मात्र, गृहविभागात ही पहिलीच बाब असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्‍या. मागिल महिन्यात तामिळनाडु राज्यातील एका तृतिय पंथीयाबाबतीत घेतलेल्‍या निर्णयाच्या आधारे पोलीस खात्याने ललिताला दिलासा देणारा निर्णय घेतला. लिंगपरिवर्तनानंतर ललिताची आवडीची पोलीस दलातील नोकरी कायम राहणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours