औरंगाबाद : औरंगाबाद हिंसाचार प्रकरणी  शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांना आज पोलिसांनी अटक केली. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसोबत गोंधळ घालून काच फोडल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
औरंगाबाद हिंसाचार प्रकरणीत काल रविवारी  शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.   पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या ताब्यात घेतल्यामुळे प्रदीप जयस्वाल क्रांतीचौक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते तेव्हा पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची झाली होती. या गोंधळादरम्यान पोलीस स्टेशनमधील वस्तूंची तोडफोड झाली. पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणी प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दुपारी त्यांना अटक करण्यात आली.
जैस्वाल हे औरंगाबादेतील लोकप्रसिद्ध आमदार आहेत. त्यांच्या अटकेमुळे वातावरण पुन्हा बिघडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.
जैस्वाल यांना सायंकाळपर्यंत कोर्टासमोर उभे कऱण्यात येणार आहे. मात्र जैस्वाल यांनी हिंसाचार प्रकऱणावरून पोलीस निष्पाप नागरीकांनी त्रास देत आहे. त्याचाच जाब विचारण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात गेलो होतो अशी प्रतिक्रीया दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours